खानापूर : हुतात्मा दिनानिमित्त 17 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे धरणे आंदोलनात खानापूर तालुका म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करुन शिवस्मारक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. सकाळी हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर 10 वाजता माजी आमदार दिगंबर पाटील, समिती अध्यक्ष गोपाळ देसाई याच्या हस्ते शिवपुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा घोषणांनी शिवस्मारक परिसर दणाणून सोडला. यानंतर सर्व कार्यकर्ते कोल्हापूरकडे रवाना झाले.
माजी आमदार दिगंबर पाटील, गोपाळ देसाई, संजू पाटील, राजाराम देसाई, दत्तू कुट्रे, जगन्नाथ बिरजे, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, विठ्ठल गुरव, कृष्णा कुंभार, भीमसेन करंबळकर, अन्नाबाळ पाटील, शंकरराव पाटील, गुरुराज देसाई, बाळासाहेब शेलार, रमेश धबाले, मुकूंद पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, मारुती परमेकर, जयराम देसाई, रविंद्र शिंदे, वसंत नावलकर, विजय गुरव, विठ्ठल देसाई, मोहन देसाई, चंद्रकांत देसाई, राजू चिखलकर, विठ्ठल राजगोळकर, महादेव केळकर, पुंडलिक मुतगेकर, पंकज सावंत, निलेश जांबोटकर, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर गावडा, महादेव गावडा यासह मोठ्या संख्येने समिती कार्यकर्ते कोल्हापुरातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.









