10.7 टक्क्यांनी आकारात घट
मानवी मेंदूचा आकार सातत्याने कमी होत आहे. यामागे हवामान बदल कारणीभूत आहे. हवामान बदलाची तीव्रता अधिक होत गेल्यास मानवी मेंदूचा आकार कमी होत जाणार आहे. एका नव्या अध्ययनातून ही भीती वाढविणारी माहिती समोर आली आहे.
हवामान बदल आणि त्याचबरोबर बदलत्या मानवी शरीराचा 50 हजार वर्षांच इतिहास आहे. कॅलिफोर्निया येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे वैज्ञानिक जेफ मॉर्गन स्टिबल यांनी हवामान बदलाला माणूस कशाप्रकारे सामोरा जातोय, मानवी मेंदूवर याचा कोणता परिणाम होतोय यासंबंधी अध्ययन केले आहे.

ज्याप्रकारे सध्या पूर्ण जगात हवामान बदलतेय, तापमान वाढत आहे, ते पाहता मानवी मेंदूवर हवामान बदलाचा होणार परिणाम समजणे सोपे नाही. परंतु यामुळे मानवी मेंदूचा आकार लहान होत चालला आहे, त्याच्या वर्तनावरही प्रभाव पडत असल्याचे स्टिबल यांनी स्वत:च्या अध्ययन अहवालात नमूद केले आहे.
जेफ मॉर्गन यांनी 298 मानवी मेंदूच्या आकारांचे अध्ययन केले आहे. हे स्पेसिमेन म्हणजेच जुन्या मानवांचे जीवाश्म आहेत. जे 50 हजार वर्षे जुन्या काळापासून नव्या काळातील आहेत. अध्ययनात जागतिक तापमान, आर्द्रता आण पावसाच्या आकडेवारीलाही पाहिले गेले. यातून भीती वाढविणारा निष्कर्ष समोर आला आहे.
हवामान तप्त होऊ लागताच मेंदूचा आकार घटू लागतो. तर हिवाळ्यात हा आकार फैलावतो. मानवी मेंदूचा आकार वेळावेळी बदलत राहिला आहे. परंतु यावर अत्यंत कमी अध्ययन झाले आहे. अनेक प्रजातींच्या जीवांच्या मेंदूचा आकार काही लाख वर्षांमध्य वाढला आहे. तर माणसांसोबत याच्या उलट घडल्याचे जेफ यांनी सांगितले.
जेफ यांनी 50 हजार वर्षे जुन्या 298 मानवी कवट्यांवर अध्ययन केले. तसेच कवटी मिळालेल्या भौगोलिक स्थानावरील हवामान विचारात घेतले. जीवाश्माला याच्या वयाच्या हिशेबानुसार विभागण्यात आले. जीवाश्माला 100 वर्षे, 5 हजार वर्षे, 10 हजार वर्षे अणि 15 हजार किंवा त्याहून अधिक जुन्या श्रेणीत विभागण्यात आले. जेणेकरून वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या हवामानानुसार मेंदूच्या आकाराची गणना करता येईल. डाटा युरोपियन प्रोजेक्ट फॉर आइस कोरिंग इन अंटार्क्टिका डोम सीमधून मिळविण्यात आला. हा प्रकलप 8 लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा सरफेस टेम्परेचरचा रिकॉर्ड राखून आहे. अखेरची 50 हजार वर्षे ग्लेशियल मॅक्सिमम होती, यामुळे तापमान थंड राहिले होते. परंतु हे केवळ एखेरच्या प्लीस्टोसीनपर्यंत. यानंतर होलोसीन म्हणजेच आधुनिक मानवी युगात तापमान वाढण्यास सुरुवात झाली, जी अद्याप सुरू आहे.
होलोसीनच्या प्रारंभी म्हणजेच सुमारे 12 हजार वर्षांपूर्वीपासून आतापर्यंत मानवी मेंदूच्या आकारात 10.7 टक्क्यांची घट झाली आहे. अखेरचे ग्लेशियल मॅक्सिमम 17 हजार वर्षांपूर्वी होते, त्यानंतर सातत्याने तापमानात वाढ होत आहे. हवामान बदलत असल्याने मानवी मेंदूचा आकार कमी होत असल्याचे जेफ म्हणाले. यासंबंधीचे अध्ययन ब्रेन, बिहेवियर अँड इव्होल्यूशनल नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.









