‘पूजा मेरी जान’साठी येणार एकत्र
मॅडॉक फिल्म्सने मंगळवारी स्वतःचा नवा चित्रपट ‘पूजा मेरी जान’ची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच टीझरसोबत चित्रपटातील कलाकारांची माहिती देण्यात आली आहे. ‘पूजा मेरी जान’मध्ये हुमा कुरैशी अन् मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी केली आहे.
चित्रपटात हुमा ही सना नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर पूजा ही भूमिका मृणाल ठाकूर साकारतेय. विक्रम सिंह चौहान आणि विजय राज या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. कनिष्का आणि नवजोत गुलाटी यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. तर गुलाटी यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे.

अमर कौशिक यांनी यापूर्वी दिनेश विजनचा चित्रपट ‘स्त्राr’द्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले होते. आयुष्यमान खुराना आणि यामी गौतमसोबतचा त्यांचा ‘बाला’ हा चित्रपटही यशस्वी ठरला होता. वरुण धवनसोबतचा ‘भेडिया’ चालू वर्षात प्रदर्शित होणार असून यात क्रीति सेनॉन मुख्य नायिका आहे. अमर कौशिकमचे चित्रपट विनोदी धाटणीचे असतात.
हुमा कुरैशी लवकरच मोनिका ओ माय डार्लिंग, डबल एक्स एल आणि तरला या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. याचबरोबर सोनी-लिव्हची वेबसीरिज ‘महारानी 2’मध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. तर मृणाल ठाकूर ही ‘पिप्पा’, ‘आंख मिचौली’ आणि ‘गुमराह’ या चित्रपटांमधून झळकणार आहे.









