नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरासह पाच ठिकाणी छापे टाकले. या छाप्यादरम्यान अमानतुल्ला यांच्या दोन जवळच्या साथीदारांच्या घरातून 24 लाखांची रोकड आणि दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. यानंतर खान यांना अटक करण्यात आली. छाप्यादरम्यान खान यांच्या समर्थकांनी एसीबीच्या अधिकाऱयाशी गैरवर्तन केल्यामुळे चौघांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी रविवारी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.









