ब्रिटनच्या ‘मुन्नाभाई’ची अनोखी बिझनेस आयडिया
संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात नायक म्हणजेच ‘मुन्ना’ प्रत्येकाला ‘जादू की झप्पी’ देतो, म्हणजेच लोकांची गळाभेट घेतो, याद्वारे तो त्यांचा मूड चांगला करून त्यांना मानसिकदृष्टय़ा चांगले वाटावे असा प्रयत्न करतो. ब्रिटनमधील एका व्यक्तीने जणू याच चित्रपटातून प्रेरणा घेत अनोखा बिझनेस सुरू केला आहे. या व्यक्तीनेही ‘मुन्नाभाई’प्रमाणेच लोकांना ‘जादू की झप्पी’ देण्याचे काम सुरू केले आहे. फरक केवळ इतकाच आहे की हे काम तो पैशांसाठी करतो.
कॅनडाचा रहिवासी असणाऱया 30 वर्षीय ट्रेवर हूटॉनने इंग्लंडमध्ये ‘एम्ब्रेस कनेक्शन’ नावाचा एक बिझनेस सुरू केला आहे. स्वतःच्या या बिझनेस अंतर्गत तो अनोळखी लोकांची गळाभेट घेतो. या कामासाठी तो मोठी रक्कमही आकारत आहे.

इतर लोकांसोबत संबंध प्रस्थापित करण्यास असमर्थन असलेल्या किंवा नैराश्य आणि एकाकीपणाला तोंड देत असलेल्या लोकांना तो मदत करतो. स्पर्शाच्या शक्तीद्वारे लोकांमध्ये प्रेमाची भावना जिवंत ठेवण्याचे काम करत असलो तरीही अनेक लोक माझ्या कामाला पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. काही लोक या बिझनेसला ऍडल्ड इंडस्ट्रीशी निगडित मानतात, परंतु ही धारणा पूर्णपणे चुकीचे असल्याचे ट्रेवरने म्हटले आहे.
प्रोफेशनल कडलिंग एक आवश्यक आणि सन्मानजनक काम आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी मानवी संबंध आणि कनेक्शनवर संशोधन सुरू केले होते. यासंबंधीचे शास्त्र पूर्णपणे समजून घेऊ इच्छित होतो असे ट्रेवरने सांगितले. ट्रेवरने चालू वर्षी हा व्यवसाय सुरू केला आहे. गळाभेट घेण्याच्या थेरपीद्वारे लोकांवर तो उपचार करतो. हे लोक एकाकीपणाला तोंड देत असतात किंवा त्यांना सहजपणे इतरांसोबत संबंध प्रस्थापित करणे जमत नसते.
ट्रेवर या व्यवसायाद्वारे एक तासाच्या सेशनसाठी 7 हजार रुपये आकारतो. माझ्यात आणि ग्राहकामध्ये कुठलेही शारीरिक संबंध प्रस्थापित होत नसतात. प्रथम ग्राहकाशी संभाषण करत त्याला नेमके काय हवे हे जाणून घेतो, मगच माझी सेवा प्रदान करतो. गळाभेट घेण्यासह एक्रो योगा यासारख्या कलेचे प्रशिक्षण देत असल्याचे ट्रेवरने सांगितले.









