रमाकांत कोंडुस्कर यांचे सर्वत्र स्वागत : आज पिरनवाडी-बाळगमट्टी परिसरात प्रचार
बेळगाव : दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी बुधवारी अनगोळ, भाग्यनगर, टिळकवाडी या भागात पदयात्रा काढली. या पदयात्रेला सर्वत्र भरभरून पाठिंबा मिळाला. सकाळी 7 वाजता अनगोळ नाक्यावरून प्रचारफेरीला प्रारंभ झाला. अनगोळ नाक्यावरील स्वयंभू गणेश मंदिर येथे पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या प्रतिमांचे पूजन उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात झाली. अनगोळ भागातील विविध संघटनांच्या माध्यमातून रमाकांत कोंडुस्कर यांचा सत्कार करण्यात आला. या पदयात्रेमध्ये हातात फलक घेऊन तरुण तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांचे शोषण करण्याबाबतचे फलक त्यांच्या हाती होते. यावेळी विविध संघटना, गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. भाग्यनगर संपूर्ण क्रॉस, विद्यानगर, कृषी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, अनगोळ मुख्य रस्ता, स्वामी विवेकानंद नगर, चिदंबरनगर, मृत्युंजयनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर चिदंबरनगर येथील उद्यानाजवळ प्रचारफेरीची सांगता झाली. यावेळी प्रभाकर पाटील, बी. ओ. येतोजी, माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक राकेश पलंगे, अनिल पाटील, संभाजी चव्हाण, मोहन भांदुर्गे, संजय सातेरी, दिलीप बर्डे, प्रभाकर बाळु कुरळे, माजी उपमहापौर संजय शिंदे, श्रीधर पाटील, नारायण पाटील, विनायक गुंजटकर, सागर गुंजीकर, भारत नागरोळे, मोहन पाटील, रोहन पाटील, निखिल भातकांडे, सुधीर लोहार, प्रभाकर अष्टेकर, भरत पाटील, सचिन पाटील, अमित पाटील, उमेश पाटील, उदय पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, सुनील मादार, नारायण कोंडुस्कर, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, रवी गोडसे, विजय चौगुले, भारत रोळी, प्रवीण कुरणे, नितीन चौगुले, शरद कुरणे, आशिष कुरणकर, प्रथमेश कुरणकर, संतोष पोटे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज सायंकाळी पिरनवाडीतून प्रचार पदयात्रा
गुरुवार दि. 4 मे रोजी बाळगमट्टी परिसरात प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे. पिरनवाडीतील गणपत गल्ली येथून सायंकाळी 5 वाजता पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर रामदेव गल्ली, तारानगर, जिनदत्त गल्ली, हुंचेनहट्टी गावात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर बाळगमट्टी येथे मतदारांची भेट घेण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
उद्या टिळकवाडी भागात प्रचार
शुक्रवार दि. 5 मे रोजी सकाळी 7 वाजता रमाकांत कोंडुस्कर यांचा प्रचार टिळकवाडी परिसरात होणार आहे. आरपीडी क्रॉस येथून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर संपूर्ण टिळकवाडी, शुक्रवारपेठ, गोवावेस स्वीमिंग पूल येथे सांगता होणार आहे. तरी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवक मंडळे, महिला मंडळे यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.









