बेळगाव : दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची पदयात्रा शहापूर, पश्चिम भागामध्ये उत्स्फूर्तपणे निघाली. यावेळी सर्वांनीच त्यांना भरघोस पाठिंबा दर्शविला. मराठीचा बुलंद आवाज घुमल्याने सारा परिसर समितीमय झाला आहे. मंगळवारी सायंकाळी महात्मा फुले रोड येथील बँक ऑफ इंडिया येथून प्रचारफेरीला प्रारंभ झाला. त्यानंतर महात्मा फुले रोड, बुरजाई गल्ली, रामलिंगवाडी, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, भोज गल्ली, मेलगे गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, आनंदवाडी, पी. के. क्वॉर्टर्स येथून बॅ. नाथ पै चौकामध्ये या पदयात्रेची सांगता झाली. माजी महापौर महेश नाईक व माजी नगरसेवक विजय भोसले यांनी उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचे स्वागत केले. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रामलिंगवाडी येथे सुनील बोकडे, राजकुमार बोकडे या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. कोरे गल्ली येथील गंगापुरी मठामध्ये शिवाजी हावळाण्णाचे यांनी स्वागत केले. महिलांनी ठिकठिकाणी आरती ओवाळून औक्षण केले. या प्रचारफेरीमध्ये रणजीत हावळाण्णाचे, सुधीर नेसरीकर, शिवाजी कुडुचकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी नगरसेवक राकेश पलंगे, मोहन पाटील, महादेव पाटील, गणेश द•ाrकर, अनिल आमरोळे, प्रशांत भातकांडे, विजय बिर्जे, अभिजित मजुकर, गजानन शहापूरकर, भाऊ मंडोळकर, शिवाजी मजुकर, विराज मुरकुंबी, सचिन केळवेकर, श्रीकांत कदम, शिवराज पाटील, संतोष कृष्णाचे, आप्पाजी काकतकर, संजय पाटील, वैभव कामत, प्रमोद गावडोजी, सागर पाटील, विशाल कंग्राळकर, शेखर तळवार, महेश भोसले, शाम कोंडुस्कर, शांताराम होसूरकर, संतोष शिवणगेकर, विशाल कंग्राळकर, प्रा. आनंद आपटेकर, प्रा. एन. पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
रमाकांत कोंडुस्कर यांची आज शहापूर परिसरात प्रचारफेरी
दक्षिण मतदार संघाचे म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचा गुरुवार दि. 27 रोजी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथून प्रचारफेरीला प्रारंभ होणार आहे. सकाळी 7 वाजता या फेरीला प्रारंभ होणार असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बोळमल गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, जोशी गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, बॅ. नाथ पै चौक, डबल रोड येथे सांगता होणार आहे. सायंकाळी 5 वाजता झाडशहापूर गावामध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर मच्छे गावामध्येही मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. तरी या परिसरातील म. ए. समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पंच मंडळींनी आवर्जुन उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.









