प्रतिनिधी / पणजी
रक्तदानाचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहचावे या उद्देशाने लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटीतर्फे आयोजित आणि तरूण भारत व टूगेदार फॉर पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने व गोवा मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने बोरभाट ताळगाव येथील लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटीच्या शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्यच्या पदाधिकाऱ्यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालिका सई ठाकूर बिजलानी, लोकमान्यचे उत्तर गोव्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक आग्नेलो कार्व्हालो, एच आर गायत्री दुभाषी नाईक, शाखा व्यवस्थापक संगीता नायक व अवधूत कामत, इतर मान्यवर उपस्थित होते.

रक्तदात्याला प्रशस्तीपत्रक देताना लोकमान्यच्या संचालक सई ठाकूर बिजलानी.
सदर रक्तदान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. संचालिका सई ठाकूर यांनीही यावेळी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. पणजीतील तसेच पणजीबाहेरील विविध भागातून जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. सदर शिबिरात 20 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. याशिवाय तरूण भारतच्या काही कर्मचाऱ्यांनीही या शिबिरात रक्तदान केले. सदर शिबिरात सहभाग घेतल्यामुळे रक्तदान केलेल्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
सदर शिबिराकरिता गोमेकॉच्या रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कोरगावकर, डॉ. निमिशा नाईक, परिचारिका रिना, सिद्धेश गावस, तुषार देसाई, लॅब असिस्टंट हरिष आमोणकर, एमटीएस विठ्ठल कांदोळकर, प्रवीण गावकर यांचे मार्गदर्शन लाभले.









