ब्रह्मलिंगहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील हजारो महिला, पुरुषांसह युवकांची उपस्थिती
बेळगाव : धामणे, बसवाण गल्ली येथील आयोजित सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून धामणे विभागातील ब्रह्मलिंगहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील हजारो महिला, पुरुष व युवक उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते मारुती बसवंत बाळेकुंद्री होते. याप्रसंगी उपस्थित मध्यवर्ती म. ए. समितीचे नेते मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सभेच्या सुरुवातीला गावातील ग्रा. पं. सदस्य एम. आर. पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष योगिता बेन्नाळकर, उपाध्यक्ष मंजुळा मेलीनमनी, दलित नेते अध्यक्ष रवी बस्तवाडकर, बाळू केरवाडकर, स्नेहल पाटील, मनोहर जायाणाचे, विजय बाळेकुंद्री यांनी गावाच्यावतीने जाहीर पाठिंबा व्यक्त केला. त्याचप्रमाणे गुणवंत पाटील, श्रीकांत कदम, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव या नेत्यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे बेळगाव दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी याप्रसंगी उपस्थित सभेतील जनतेचा आशीर्वाद घेऊन मला येत्या 10 तारखेला होणाऱ्या मतदानादिवशी ट्रक या चित्रासमोरील बटण दाबून विजयी करा, असे संबोधित केले. सूत्रसंचालन यल्लाप्पा रेमाणाचे यांनी केले. याप्रसंगी धामणे विभाग शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते, मराठी भाषिक आघाडीच्या महिला, गावातील सर्व युवक मंडळे, महिला वर्ग, धामणे विभाग म. ए. समितीचे उमेश डुकरे, तातोबा मरगाणाचे, महेश पाटील, परशराम बस्तवाडकर, बापू पाटील, महादेव येळवी, दशरथ यळ्ळूरकर, मोहन पाटील, गजानन जायाणाचे, शिवाजी पाटील आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.









