प्रतिनिधी / बेळगाव
सराफ गल्ली, शहापूर येथील हॉटेल समुद्रमध्ये आयोजित केलेल्या सी-फूड फेस्टला बेळगाव खाद्यप्रेमींकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याने सदर सी-फूड फेस्ट 1 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
नामवंत शेफच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे मत्स्य पदार्थ या फूड फेस्टमध्ये उपलब्ध आहेत. या फेस्टचा बेळगाव व आजूबाजूच्या शहरातील अनेक खाद्यप्रेमींनी सहकुटुंब व मित्र परिवारासोबत आनंद घेतला आहे. रोज दुपारी 12.30 ते 3.30 व सायंकाळी 7.30 ते 10.30 दरम्यान हॉटेल समुद्र रेस्टॉरेंटमध्ये या फेस्टचे आयोजन केले आहे. सुरमई, बांगडा, झिंगे व खेकडय़ांच्या अनेक चविष्ट पदार्थांची रेलचेल या फेस्टमध्ये आहे. फिश थाळी व करी या दोन्ही प्रकारचे विविध पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. सुरमई थाळी, प्रॉन कोळीवाडा, फिश टिक्का, अमृतसरी, प्रॉन बटर गार्लिक, खास गोवन पद्धतीच्या विविध करी या फूड फेस्टचे खास आकर्षण बनले आहे.









