कोजागिरी पौर्णिमेपासून यात्रोत्सवाला सुरुवात, रथोत्सव उत्साहात
वार्ताहर/नंदगड
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हलशी येथील श्री भुवराह नृसिंह देवाच्या यात्रोत्सवाला कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसापासून यात्रोत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. यात्रेनिमित्त कोजागिरी पोर्णिमेपासून विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा पार पडले आहेत. होमहवनही झाला. रथोत्सव व पालखी उत्सवही पार पडला. रथ ओढण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रथही सजविण्यात आला होता. मंदिराजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारची दुकाने लावण्यात आली आहेत. यात्रेनिमित्त खळ्याच्या कुस्त्या झाल्या. यामध्ये स्थानिक कुस्ती पट्टूनी सहभाग दर्शविला होता.









