बेळगाव : कापड खरेदीत बेळगावमधील विश्वसनीय ब्रँड असलेल्या बीएससी टेक्स्टाईल मॉलच्या डबल डिस्काऊंट सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी मॉलमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. श्रावण उत्सवानिमित्त डबल डिस्काऊंट सेलला महिला वर्गाने तुफान प्रतिसाद दिला. पश्चिम महाराष्ट्र, गोवा व उत्तर कर्नाटकातील बीएससी हा सर्वात मोठा टेक्स्टाईल मॉल आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंतचे सर्व कपडे याठिकाणी एकाच छताखाली मिळतात. ब्रँडेड कपडे सवलतीच्या दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे.
कॉटन व सिंथेटिक साड्या, रेशमी साड्या, कांचीपूरम, धर्मावरम, बनारसी सिल्क साड्यांना विशेष मागणी आहे. साड्या खरेदीसाठी बेळगावसह आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होत आहे. महिलांसोबत तरुणी चुडीदार, वेस्टर्न वेअर, डिझायनर ड्रेस, जीन्स त्याचबरोबर गृह सजावटीचे बेडशिट, टॉवेल, चादर यासह इतर साहित्य विक्री केली जात आहे. महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरीदेखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, फॅब्रिक कलेक्शन, शेरवाणी, ब्लेझर यासह इतर कपडे खरेदी करण्याकडे कल आहे. आकर्षक डिस्काऊंट दिला जात असल्याने शनिवारी व रविवारी आणखी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.









