बेळगाव : आर. एम. एन. टेक्स्टाईलच्यावतीने गेल्या शुक्रवारपासून मराठा मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या भव्य डिस्काउंट सेलला बेळगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. मागील तीन दिवसांत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली असून, हा सेल अजून तीन दिवस म्हणजेच बुधवार दि. 9 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
90 टक्केपर्यंत सवलत,प्रचंड व्हरायटी!
देशभरातील शॉपिंग मॉल्सना कपडे पुरवणाऱ्या आर. एम. एन. टेक्स्टाईल कंपनीच्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनात 90 टक्केपर्यंत सवलतीत लेडीज, जेंट्स, किड्स गारमेंट्स तसेच साड्या उपलब्ध आहेत.
उपलब्ध ब्रँड्स
जॉन मिलर, फ्लाईंग मशीन, बफेलो, इंडिगो नेशन, लोकोमोटिव्ह, लंडन बीट, इंडियन टेरीन, हायलँड आदी नामांकित ब्रँडचे शर्ट्स, टी-शर्ट्स, ट्राउझर्स, जीन्स, कुर्ती, ड्रेस मटेरियल, ब्लेझर्स आदी कपडे येथे सवलतीत मिळत आहेत.
स्पेशल ऑफर्स
लहान मुलांचे कपडे फक्त रु. 99 पासून, महिलांचे तयार कपडे रु. 149 पासून, पुरुषांचे प्रीमियम कपडे रु. 349 पासून, शर्ट्स/टी-शर्ट्स रु. 199 पासून, ब्लेझर्स रु. 999 पासून, साड्या (रु. 2000 पर्यंत किमतीच्या) फक्त रु. 149 ते रु. 249 दरात.
ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली. अनेकांनी संपूर्ण कुटुंबाची खरेदी येथे केली. काही ग्राहकांनी सांगितले की, ‘जेवढ्या पैशांत एखाद्या शोरूममध्ये दोन व्यक्तींची खरेदी होते, तेवढ्यात येथे संपूर्ण कुटुंबासाठी खरेदी करता येते.’
साड्यांचे खास दालन
भागलपुरी, कॉटन, पूनम साड्या, फॅन्सी कॉटन साड्या रु. 150 ते रु. 200 दरात उपलब्ध आहेत, ज्यांची बाजारातील किंमत रु. 500 ते रु. 2000 पर्यंत असते. टी-शर्ट तसेच बर्मुडा रु. 250 मध्ये आणि जीन्स फक्त रु. 499 मध्ये तरुण वर्गासाठी आकर्षण ठरत आहेत. सायंकाळच्या गर्दीपासून बचाव करण्यासाठी ग्राहकांना सकाळीच खरेदी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.









