आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने लोकांना मानसिक धक्का
अमेरिकेत धक्कादायक स्वरुपात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. 2000 ते 2021 दरम्यान आत्महत्येचा दर 37 टक्क्यांनी वाढला आहे. तर स्वकीयांना गमाविण्याचे दु:ख आणि धक्क्यातून सावरण्यासाठी कौन्सिलिंग कॅम्प वाढले आहेत. येथे येणाऱ्या लोकांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यातून मोठ्या संख्येत लोक स्वकीयांना गामविण्याच्या दु:खाला सामोरे जात असल्याचे स्पष्ट होते. यातील बहुतांश मुले असून त्यांनी स्वत:ची आई किंवा वडिल किंवा एखाद्या नातेवाईकाला गमाविले आहे.

अशा लोकांना आणि मुलांना दु:खातून सावरण्यासाठी समुपदेशनाची गरज असते. अमेरिकेत अनेक वर्षांपासून काही स्वयंसेवी संस्था विशेष शिबिर कम्फर्ट झोन कॅम्प चालवित आहेत. तसेच स्वतंत्र स्वरुपातही कॅम्प आयोजित होत असून त्यांना आत्महत्या शोक निवारण शिबिर म्हटले जातेय. न्यू जर्सीच्या ग्रामीण भागात अशाप्रकारचा कॅम्प चालविणाऱ्या लिन ह्युजेसने तीन दिवसीय कॅम्प आयोजित केला आणि यात लहान मुले, किशोरवयीन आणि युवांसमवेत 72 जण सामील झाले.
लिन यांनी 20 वर्षांपूर्वी कम्फर्ट झोन कॅम्पची स्थापना केली होती. कम्फर्ट झोनच्या कॅम्पमध्ये उपस्थिती 2002-23 पर्यंत सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. 2021 मध्ये अमेरिकेत सुमारे 50 हजार लोकांनी आत्महत्या केली. 4.50 लाखाहून अधिक अमेरिकन मुले वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत आत्महत्येमुळे आई किंवा वडिलांना गमावत असतात असा अनुमान जूडीज हाउसने व्यक्त केला आहे.
किशोरवयीनांमध्ये आत्महत्येचा विचार
2021 पर्यंत हायस्कुलमधील 40 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपण दु:खी किंवा निराश असल्याचे नमूद केले होते. तर 30 टक्के किशोरवयीन मुली आणि 14 टक्के किशोरवयीन मुलांनी गंभीरपणे आत्महत्येचा विचार केला होता. डाटानुसार 13 टक्के किशोरवयीन मुली आणि 7 टक्के किशोरवयीन मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे संशोधनातून समोर आले आहे.
योग्यवेळी समुपदेशनाची गरज
2014 मध्ये अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचे सायकोसोशल कौन्सिलिंग केले. कौन्सिलिंगच्या पहिल्या वर्षात या लोकांमध्ये आत्महत्येचा दर 27 टक्क्यांपर्यंत कमी झाला. 5 वर्षांनंतरही कौन्सिलिंगमध्ये सामील होणाऱ्या लोकांमधील आत्महत्येच्या विचारांमध्ये 26 टक्क्यांपर्यंत घट झाली. 10 वर्षांनंतरही लोकांवरील समुपदेशनाचा सकारात्मक प्रभाव दिसून आला.









