नवाजुद्दीन सिद्दीकी अत्यंत आगळ्यावेगळ्या भूमिकेत
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच त्याचा चित्रपट टीकू वेड्स शेरू प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो अवनीत कौरसोबत दिसून आला होता. तर आता त्याचा नवा चित्रपट ‘हड्डी’चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपने सोशल मीडियावर ‘ हड्डी’ चित्रपटाचे नवे पोस्टर जारी करत याच्या प्रदर्शनासंबंधी माहिती दिली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन हा ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील अभिनेत्याचे तीन लुक आतापर्यंत समोर आले आहेत. त्याच्या या लुकचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित होणार असला तरीही त्याच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय अजय शर्मा यांनी केले असून झी स्टुडिओकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाकडून नवाजुद्दीन सिद्दीकीला मोठ्या अपेक्षा आहेत.









