वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कनिष्ठांच्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि आयुष शेट्टी यांनी बुधवारी दुसऱ्या दिवशी आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. बुधवारी भारताच्या बॅडमिंटनपटूंनी 12 पैकी 10 लढती जिंकल्या.
मुलांच्या एकेरीतील सामन्यात आयुष शेट्टीने मलेशियाच्या द्वितीय मानांकित इवेचा 21-17, 21-17 तर मुलींच्या एकेरीतील सामन्यात भारताच्या उनाती हुडाने पोलंडच्या जोनाचा केवळ 22 मिनिटात 21-14, 21-9 असा पराभव केला. मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या समरवीर आणि राधिका शर्मा यांनीही इस्टोनियाच्या आंद्रे व इमिली यांचा 21-12, 21-11 असा पराभव केला. सात्विक रे•ाr आणि वैष्णवी खाडेकर यांनी पोर्तुगालच्या तियागो व सोसा यांचा 21-15, 21-6 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.









