मडगाव रेल्वे पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव रेल्वे पोलिसांनी मुळ गणेशपेड, हुबळी, कर्नाटक येथील शाहनवाझ ख्वाजा बेपारी (21) या तरूणाला मोबाईल चारी प्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
शाहनवाझ ख्वाजा बेपारी याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत 76 हजार रूपये होत आहे. बेवारी याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
बेपारी सध्या खारेबंद मडगाव येथे वास्तव्यास आहे. कोकण रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गुलदार या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.









