Hubballi Ganesh Chaturthi Celebrations : धारवाड महापालिका आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळत कर्नाटक उच्च न्यायालयाने गणेश चतुर्थीला परवानगी दिली आहे. काही अटींसह हुबळी येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास पूजेला परवानगी दिली आहे.
यापूर्वी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारताना हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं होतं. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणाची तातडीनं सुनावणी करण्यात आली. 31 ऑगस्टच्या मध्यरात्री या प्रकरणावरील सुनावणी पार पडली.
Previous Articleजम्मूमधील किश्तवाडमध्ये ३०० फूट खोल दरीत कोसळली कार, ८ जण ठार
Next Article पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम आता मराठीत









