चिनी कंपनीचा सॅटेलाइट फोन
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या भारतीय सुरक्षा यंत्रणांना या हल्ल्याकरता चीनची मोबाइल कंपनी हुवेईच्या सॅटेलाइट फोनचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. पहलगाम येथील हल्ल्यादरम्यान या भागात हुवेईच्या डिव्हाइसच्या मूव्हमेंटची माहिती समोर आली आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कम्युनिकेशनच्या नव्या पद्धतींबद्दल चिंता वाढली आहे. सर्व्हिलान्स सिस्टीमद्वारे हुवेई सॅटेलाइट फोनच्या अॅक्टिव्हिटीचा शोध लागला असून आता हल्ल्याशी याच्या संभाव्य कनेक्शनसंबंधी तपास केला जात आहे.
चीनची कंपनी हुवेईवर भारतावर बंदी आहे. हुवेई बिल्ट-इन सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचरसह स्मार्टफोन तयार करते, ज्यात मेट 60 प्रो, पी60 सीरिज आणि नोवा 11 अल्ट्रा सामील आहे. या उपकरणांना विशेषकरून चीनच्या तियानटॉन्ग-1 उपग्रह जाळ्याशी कनेक्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
या फीचर फोनमध्ये सॅटेलाइट अँटेना अणि स्पेशलाइज्ड चिप असते, ज्यामुळे ते बाहेरील उपकरणाशी कनेक्ट करू शकतात. या सेवांसाठी चीनच्या टेलिकॉम कंपनीचे सिमकार्ड आणि सब्सक्रिप्शन प्लॅनची गरज असते. या फोनद्वारे कमी-बँडविड्थयुक्त व्हॉइस आणि टेक्स्ट मेसेज पाठविले जाऊ शकतात. हुवेईच्या या उपकरणांना पाकिस्तानमधून किंवा अन्य देशामधून भारतात तस्करी करत आणले गेल्याचा संशय आहे.









