उद्या पटना येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या एकजूटीच्या पार्श्वभुमीवर बैठकीवर बसपा प्रमुख मायावती यांनी टिका केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला मनाविरूद्ध एकमेकांच्या हात जोडणे अधिक असल्याचे म्हटले आहे. मायावतींना विरोधकांच्या होणाऱ्य़ा बैठकीसाठी निमंत्रित न केल्याबद्दल जेडीयूचे मुख्य प्रवक्ते के सी त्यागी यांनी 2024 मध्ये भाजपविरुद्ध लढण्यास इच्छुक असलेल्या पक्षांनाच आमंत्रित केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बसपा विरोधी आघाडीचा भाग बनणार नसल्याने त्यांना बोलवण्याला कोणताही अर्थ नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उद्या पाटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने भाजपविरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी बैठक होणार आहे. येत्या 2024 च्या निवडणुकीच्या तयारीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे असा सूर आघाडीतून दिसून येतो. या बैठकीसाठी सहभागी होणार्या पक्षांवर निशाणा साधताना बहूजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती म्हणाल्या की, “विरोधकांच्या वृत्तीवरून ते उत्तर प्रदेशबाबत गंभीर आहेत असे वाटत नाही. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागा ही निवडणूक यशाची गुरुकिल्ली आहे. परंतु विरोधी पक्षांच्या वागण्यावरून असे वाटत नाही की ते येथे आपल्या ध्येयाबाबत किती गंभीर आणि चिंतित आहेत. कोणत्याही प्राधान्यक्रमांशिवाय तयारी करण्यात येईल का? उत्तर प्रदेशाच्या लोकसभा निवडणुकांचा निकाल खरोखरच मोठा बदल घडवून आणतील?” असेही त्या म्हणाल्या.