कोल्हापूर प्रतिनिधी:
आज कोल्हापूर येथे महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यल्गार मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलकांनी विविध वेशभूषेद्वारे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन जगणे अवघड बनले आहे. विशेषतः सीएनजी गॅस मध्ये झालेली दरवाढ ही सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजेवर आघात करणारी असून त्याचा निषेध म्हणून हा यलगार मोर्चा काढण्यात आल्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. त्याचबरोबर महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन हि केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी मातीच्या चुलीवर भाकरी करून केंद्र सरकारच्या सीएनजी गॅस दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. महागाईच्या वाढत्या तीव्रतेचा आपल्या असुरी वेशभुषेद्वारे निषेध करणारी महिला चर्चेचा विषय ठरली.दसरा चौकातून या मोर्चाची सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्याचा समारोप झाला.








