Increase In Milk Price : ऐन दिवाळीच्या सणात जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ केली आहे. गोकुळमधील सत्तांतरानंतर आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने गेल्या दीड वर्षात सलग सहाव्यांदा ही दरवाढ केली आहे. ही दरवाढ करण्यामागील नेमके काय कारण आहे याबबात इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. ती नेमकी कोणती पाहूया.
पावसाळा संपायच्या आधीच दुधाचे दर वाढले याचे स्पष्ट संकेत असे आहेत की जानेवारी ते मार्च मध्ये देशात दुधाची टंचाई होऊ शकते असं निरीक्षण चेतन नरके यांनी कोल्हापुरात नोंदवलं आहे. याचे मुख्य कारण लम्पीस्किन रोगाचा झालेला परिणाम सांगितला जातोय.
या रोगामुळे पशुधन कमी झालं आहे. दुसरं कारण म्हणजे चाऱ्याची टंचाई आहे.चारा खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करावा लागत असल्याने उत्पादन खर्च वाढला.शेतकऱ्याने तो खर्च कमीच ठेवल्याने दुधाच्या उत्पादनात घट होतीय.आजच्या घडीला जादाच्या दुधाची पावडर दूध संघ करून ठेवत असतात.मात्र यंदा तसं होत नाही.त्यामुळे उन्हाळ्यात ज्या वेळी दूध संकलन कमी होतं त्यावेळी पावडरचा वापर करून मागणी पूर्ण केली जाते.पण यंदा हा समतोल राखणं कठीण होणार आहे.आताच्या घडीला अमूल सह देशभरातील दूध संघांनी दुधाचे दर वाढवले आहेत.हे दर आणखी 5 ते 6 रुपये प्रतिलिटर वाढू शकतात.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









