पुणे- बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून कोकणाने आपले स्थान कायम ठेवून राज्यात प्रथम मान पटकावला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील १५ लाख विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत होते. यानुसार महाराष्ट्राचा निकाल ९४. २२ टक्के लागला असून कोकण विभागाचा सर्वाधिक ९७. २२ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०. ९१ टक्के आहे. तर गतसाली झालेल्या परीक्षेत राज्याचा निकाल ९९.५३ टक्क्यांपेक्षा अधिक लागला होता. मात्र यंदा हि टक्केवारी ५.६१ घसरली आहे. गतसाली परीक्षा न घेता मुल्याकंनच्या आधारावर हा निकाल दिला होता. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
सत्र २०२१-२२ च्या बारावी परीक्षेसाठी एकूण १४ लाख ८५ हजार १९१ उमेदवारांनी नावनोंदणी केली होती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने ४ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत परीक्षा घेतल्या होत्या. यंदा हि परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
विभागनिहाय निकाल
कोकण – 97.22 टक्के
पुणे – 93.61 टक्के
कोल्हापूर – 95.07 टक्के
अमरावती – 96.34 टक्के
नागपूर – 96.52 टक्के
लातूर – 95. 25 टक्के
मुंबई – 90.91 टक्के
नाशिक – 95.03 टक्के
औरंगाबाद – 94.97 टक्के