पणजी : ढवळी-फोंडा येथील कु. हृषीकेश ढवळीकर याला भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सी. सी. आर. टी. ची सुप्रतिष्ठित अशी साल 2022-23 साठीची हिंदुस्थानी शास्त्राrय संगीतासाठी सांस्कृतिक प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. देशभरातून आलेल्या प्रतियोगीमधून 22 जणांची निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आली आहे व त्यामध्ये गोव्याचा हृषीकेश अव्वल क्रमांकाने निवडण्यात आला ही समस्त गोव्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. 14 वर्षीय हृषीकेश सध्या ई. 9 वी चा विद्यार्थी असून त्याला सांगीतिक वारसा आजोबा व संगीतकार-गायक श्री. गो. रा. ढवळीकर यांच्याकडून लाभला आहे. वयाच्या 7 व्या वर्षापासून तो शास्त्राrय संगीताचा अभ्यास करत आहे. त्याने मुग्धा गांवकर यांच्याकडून 5 वर्षे मार्गदर्शन घेतले असून सध्या प्राची जठार व वडील नितीन ढवळीकर यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्राrय गायन तसेच शिवानी माऊलकर -दसककर यांच्याकडून ठुमरी गायनाचे प्रशिक्षण घेत आहे. लहान वयातच हृषीकेशने खयाल गायनामधे आपला ठसा उमटवला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रतियोगीतांमद्धे यश प्राप्त केले आहे ज्यामध्ये रामरंग समिती वाराणसी आयोजित खयाल गायन प्रतियोगीता, सुरंजन ट्रस्ट मुंबई आयोजित खयाल गायन प्रतियोगीता, आर्ट सर्कल बेळगाव आयोजित खयाल गायन तसेच अभंग गायन प्रतियोगीता, कोल्हापूर येथील मदनमोहन लोहिया ट्रस्ट आयोजित नाट्यागीत व भावगीत प्रतियोगीता, बिल्वदल साखळी व लोकमान्य आयोजित खुल्या गटाची नाट्यागीत प्रतियोगीता, चिन्मय विश्वविद्यापीठ पुणे आयोजित भक्तीगीत गायन प्रतियोगीता, ऊद्रेश्वर पणजी आयोजित गोमंतस्वर प्रतियोगीता अशा अनेक प्रतियोगीतांमद्धे सहभागी होऊन पुरस्कार प्राप्त केले आहेत.
गोव्यातील अभिनव कला मंदिर आयोजित दर्पण, सम्राट क्लब आयोजित सम्राट संगीत सभा, स्वर समर्थ गोमंतक आयोजित संगीत सभा, नंदादीप महोत्सव मडगाव, स्वरवर्षाव केरी अशा अनेक सभा-समारोहांमध्ये शास्त्राrय गायन प्रस्तुत करून त्याने रसिकांची प्रशंसा मिळवली आहे. गोव्याबाहेर स्वर-मल्हार बेळगाव, स्वराभिषेक रत्नागिरी व विदुषी डॉ.अलका देव-माऊलकर आयोजित संगीत सभांमध्ये बहारदार प्रस्तुती करून त्याने जाणकारांची प्रशंसा प्राप्त केली आहे. शास्त्राrय संगीतांबरोबरच सुगम संगीत गाण्यात हृषीकेशचा हातखंडा आहे व लहान वयातच त्याने अनेक कार्यक्रमांमधे सहभागी होऊन रसिकांची मने जिंकली आहेत. त्याला सी.सी.आर.टी. ची शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल व त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल संगीत क्षेत्रात त्याचे भरभरून कौतुक होत आहे.









