तीस दिवसांत तब्बल सोळा दिवस सुटी
पणजी : श्रीगणेशचतुर्थी हा महत्त्वाचा उत्सव असलेल्या आगामी सप्टेंबर महिन्यात तब्बल 16 दिवस बँकांना सुटी मिळणार असल्याची माहिती समोर आली असून लोकांनी त्याची दखल घेऊन बँकांतील आपापली कामे करून घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात 4 रविवार आणि 2 शनिवार मिळून एकूण 6 दिवस नियमित सुटी आहे. त्याशिवाय विविध कारणांनी 10 दिवस बँका बंद रहाणार आहेत. 3, 6, 7, 9, 10, 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 25, 27, 28 व 29 सप्टेंबर या दिवशी बँकांना सुटी आहे. त्यात शनिवार, रविवारचा समावेश आहे. एवढे दिवस बँका बंद रहाणार असल्याने जनतेची अडचण हेण्याची शक्यता आहे. ती होऊ नये म्हणून लोकांनी बँकांच्या सुट्यांची दखल घेऊन कामकाज चालू असलेल्या दिवशी कामे करावीत आणि अडचण टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दोन हजारच्या नोटांची मुदत
रु. 2000 च्या नोटा बदलण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर त्या बदलता येणार नाहीत. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी बँकांनी गर्दी होण्याची शक्यता आहे. इतके दिवस बँका बंद रहाणार असल्याने सप्टेंबर महिन्यात बँक ग्राहकांची अडचण होण्याची शक्यता आहे.
केवायसी करण्याची मुदत
काही बँकांनी खाते धारकांना केवायसी करण्याची सूचना दिली असून ती न केल्यास व्यवहार करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. केवायसी करण्यासाठी काही बँकांनी 31 ऑगस्ट 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.









