हिवाळा सुरु होताच आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात.थंड वातावरणामुळे सर्दी,खोकला,अंगदुखी या समस्यांसोबतच दम्याचेही रुग्ण जास्त आढळून येतात.अशावेळी रोगप्रतिकार शक्तीवर देखील परिणाम होऊ शकतो.म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी त्याचबरोबर आहार कसा असावा हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात प्रचंड भूक लागते. पण अशावेळी फास्टफूड किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या ऋतूमध्ये व्हिटँमिन डी असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर अधिक प्रमाणात भाज्या आणि फळांचे सेवन करावे. फळ आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
पौष्टिक अन्नासोबतच सूर्यप्रकाशातून देखील व्हिटॅमिन डी मिळत असते. यामुळे सकाळी १०- २० मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे. व्हिटॅमिन डीमुळे शरीरातील हाडे आणि स्नायू बळकट होतात.
हिवाळ्यात त्वचेच्या देखील अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे घराबाहेर पडताना लोकरीचे कपडे घालावेत. याशिवाय घरातदेखील स्लीपर्स चा वापर करावा. त्वचा कोरडी पडू नये यासाठी वेळोवेळी मॉइस्चरायझरचा देखील वापर करावा.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. किमान अर्धा तास तरी शरीराचा व्यायाम असायला हवा. नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
हिवाळ्यात पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते .यामुळे देखील त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात .यात त्वचा कोरडी पडणे आणि खाज सुटू शकते. याशिवाय ओठंही कोरडे पडतात. अशावेळी भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
हिवाळ्यात दमा, सर्दी, फ्लू, सांधेदुखी, खोकला आणि घशा खवखवणं यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. अशा समस्या जाणवत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









