Smoking: धूम्रपान आरोग्यासाठी हाणीकारक आहे. असे सिगारेटच्या पाॅकिटवर, तंबाखूच्या पुड्यांवर लिहलेले असते. मात्र व्यसन करणारी व्यक्ती याकडे दुर्लक्ष करते. आणि नियमित व्यसन करते. परिणामी अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. पुढे जाऊन त्य़ाची इतकी सवय होते की इच्छा असली तरी सवय सुटणे अवघड होते. म्हणूनच वेळेत यापासून दुर रहा. आज आम्ही तुम्हाला प्राथमिक स्वरूपात यापासून सुटका कशी मिळवावी याबद्दल टिप्स देणार आहोत. त्याविषयी जाणून घेऊया.
धूम्रपान सोडण्यासाठी या प्रभावी टिप्स वापरून पहा
-नाश्त्यात ओट्सचा समावेश करा.हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. शिवाय धूम्रपान करण्य़ाची लालसा देखील कमी करते.
-जेव्हा जेव्हा तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा होईल तेव्हा एक ग्लास पाण्यात चिमूटभर लाल तिखट टाकून प्या, व्यसन सुटण्यास मदत होईल.
-दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाणी शरीर डिटॉक्स करण्यात मदत करते. यामुळे मेटाबॉलिक कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. जेव्हा केव्हा तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा होईल त्यावेळी तुमचा आवडता पदार्थ खा.यामुळे देखील व्यसनातून बाहेर पडायला मदत होते.
-व्यसनापासून मुक्त होण्यासाठी व्यायाम करा.यामुळे तुम्ही अॅक्टिव्ह राहता. मादक पदार्थांकडे आपोआपच लक्ष कमी होते.
-एका ग्लास पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा मिक्स करून प्या. हे पेय नियमित प्यायल्याने व्यसनाची इच्छा आपोआपच कमी होते.
-मधामध्ये पुरेशा प्रमाणात एंजाइम आणि प्रथिने असतात.एक कप कोमट पाण्यात थोडेसे मध मिसळून त्याचे नियमित सेवन करा.याचा देखील तुम्हाला फायदा मिळेल.
-व्यसनापासून मुक्त मिळवण्यासाठी आहारात मुळ्य़ाचा समावेश करा. मुळा खात असताना तो मधासोबत देखील खावू शकता.
Disclaimer: धूम्रपान सोडण्यासाठी दिलेल्या टिप्स या सर्वसामान्य़ माहितीच्या आधारावर देण्यात आल्या आहेत.अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









