Maharashtrian Ambil Recipe : उन्हाळात पाणी जादा प्रमाणात प्यायल्याने अन्न कमी खाल्ले जाते. यामुळे थकवा येणे, चक्कर येणे, पोटाचे विकार सुरु होतात. सतत बाहेरील थंड पदार्थाचे सेवन केले जाते. यामुळे देखील शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी आहारात दही, ताक, नाचणीच्या आंबिलचा समावेश करावा. किमान जेवणानंतर एक ग्लास ताक घातलेले आंबिल पिल्यास पोटही भरते आणि थकवा येत नाही. आज आपण आंबिल कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत. याशिवाय आंबिल संदर्भात एक छोटी ट्रिक सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल.
साहित्य
नाचणीचे पीठ- 1 वाटी
लसूण पाकळ्या- 6 ते 7
हिरवी मिरची- चवीनुसार
कोथंबीर- आवडीनुसार
मीठ-चवीनुसार
ताक-आवडीनुसार
कृती
सुरवातीला एक वाटी नाचणीचे पीठ पाणी टाकून सरसरीत करून घ्या. त्यानंतर गॅसवर दोन वाटी पाणी गरम करण्यास ठेवा. पाणी कडक गरम झाले की त्यात नाचणीचे पीठ घालून एकसारखे हलवून घ्या. पीठाला थोडी उकळी फुटली की त्यात ठेचलेला लसूण, मिरचीचा एक तुकडा आणि मीठ टाकून घ्या. आता आणखी एकदा पीठ एकसारखे हलवून शिजवून घ्या. आता गॅस बंद करून त्यात कोथंबीर घाला. आणि तयार झालेली आंबिल गार करण्यास ठेवा. आंबिल शिजवत असताना तुम्हाला जर पीठ घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी अॅड करू शकता. आंबिल गार होईल तशी ती घट्ट होते. तुम्ही त्यात ताजे बनवलेले ताक घालून तुम्हाला हवी तशी आंबिल बनवू शकता.
टीप- आंबिल पित असताना अनेकांना मधे-मधे तोंडात येणारा लसूण किंवा कोथंबीर खायला आवडत नाही. यासाठी तुम्ही आंबिल गार झाल्यावर ती मिक्सरमधून थोडी फिरवून घ्या. यामुळे लसूण, नाचणीचे पीठ, आणि कोथंबीर एकजीव होते आणिआंबिल अजून छान लागते. त्यानंतर तुम्ही त्यात घरीच तयार केलेल फ्रेश ताक वापरू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









