गूळ आरोग्यासाठी फायदेशीर मनाला जातो. हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.याशिवाय अनेक पदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो.डायटवर असणारे लोकही साखरे ऐवजी गुळाला प्राधान्य देतात.यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यासोबतच वजन वाढण्याचा धोका नाही. पण त्यासाठी गूळही शुद्ध असायला हवा. कारण भेसळयुक्त गुळामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.म्ह्णूनच आज जाणून घेऊयात खरा गूळ कसा ओळखायचा.
खऱ्या गुळाची ओळख म्हणजे तो गडद तपकिरी रंगाचा दिसतो. गुळ स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात जेणेकरून त्याला हलका तपकिरी रंग येतो. त्याचवेळी त्याचे वजन वाढवण्यासाठी त्याला पॉलिश करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही भेसळ केली जाते.
बनावट गूळ गोड करण्यासाठी त्यात साखरेचे स्फटिक टाकले जातात. ते ओळखण्यासाठी तुम्ही गूळ पाण्यात मिक्स करा, जर गूळ तरंगला तर समजा कि खरा गूळ आहे. जर गूळ पाण्यात खाली स्थिरावला तर त्यात अनेक प्रकारची भेसळ आहे हे समजावे.
गुळाला टेस्ट करा, जर गुळाची चव किंचित खारट किंवा कडू वाटली तर समजून घ्या की गूळ शुद्ध नाही. खरा गूळ चवीला गोड असतो.
Previous Articleबसवराज बोम्माई यांनी बिम्सबद्दल केली स्तुती
Next Article देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंग आणणार









