How to Increase Oxygen Level : हिवाळ्यात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होते. यामुळे हृदय आणि फुफ्फुसावर याचा वाईट परिणाम होतो. त्यातच हवेतील विषारी प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याने शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यास प्रथम ओठांचा रंग बदलतो. ओठांवर निळ्या रंगाची झाक येते. याला स्यानोसिसचं लक्षणदेखील मानलं जातं. छातीत अचानक दुखू लागणे, अस्वस्थ वाटणे, सतत खोकला येणे, तीव्र डोकेदुखी, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे जर ही लक्षणे तुमच्या शरीरात दिसत असतील तर ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या टिप्स अवश्य फॉलो करा.
भरपूर पाणी प्या
शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्यावे असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. यासाठी दररोज किमान ३ लिटर पाणी प्यावे. पुरेसे पाणी प्यायल्याने ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते.
खजूर खा
खजूर आरोग्यासाठी औषधाप्रमाणे काम करतो. त्यात सेलेनियम, तांबे, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम,जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.याच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दूर होते.तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
श्वासोच्छवासाचे व्यायाम करा
शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी कॉर्ड ब्रीदिंग एक्सरसाइज दररोज करा. हा व्यायाम बसूनही करता येतो. त्यामुळे कोणीही श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकतो. हा व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त, श्वसन प्रणाली मजबूत होते. याशिवाय शरीरातील ऑक्सिजनची पातळीही वाढते.
ताडासन करा
ताडासन केल्याने श्वसन प्रक्रिया सुधारते,असे एका संशोधनातून समोर आले आहे.यामुळे शरीराची मुद्राही सुधारते. फुफ्फुसाचा वरचा भाग सक्रिय करण्यास देखील मदत करते.डॉक्टर अस्थमाच्या रुग्णांना ताडासन करण्याचा सल्ला देतात.
Disclaimer : वर दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









