Credit Card Closed Account : नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असतात. आजकाल अनेक बॅंकाही क्रेडिट कार्ड खरेदी करण्यासाठी काॅल करतात. क्रेडिट कार्ड जवळ असले की कर्ज काढण्याची गरज भासत नाही. एखादी वस्तू घेण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत नाही. मात्र एकदा का क्रेडिट कार्डवर खरेदीची सवय लागली की,आपण खरेदीसाठी हात मोकळा सोडतो. त्याचा परिणाम क्रेडिट कार्डचं बिल भरताना जाणवतो आणि बिल भरण्यास उशीर झाल्यास दंडही भरावा लागतो.यामुळे आपला सिव्हिल स्क्रोअर ही खराब होऊ शकतो.अशावेळी तुम्ही जर क्रेडिट कार्ड बंद करायचा विचार करत असाल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी तसेच आरबीआय बॅंकेची नियमावली काय आहे हे जाणून घेऊया.
याविषयी तुम्हाला आज आम्ही टिप्स देणार आहोत.
थकबाकी पूर्ण भरा
क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी राहिलेली थकबाकी आधी भरून घ्या. अन्यथा तुमचे व्याज वाढत जाते. रक्कम भरल्याने बँकेचा आणि तुमचा व्यवहार तर संपतोच.शिवाय, तुमच्या क्रेडिट स्कोअरला सुद्धा धक्का लागत नाही.
बॅंकेचे नियम समजून घ्या
तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद कराय़चे असल्यास बॅंकेची नियमावली समजून घ्य़ा. तसेच कार्ड रद्द करताना जर तुम्हाला शुल्क भरावे लागत असेल तर ती रक्कम तुम्ही भरा.
नवीन क्रेडिट कार्ड आधी बंद करा
तुमच्याकडे जर एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतील तर त्यापैकी जे कार्ड नवीन आहे ते आधी बंद करा. तुम्ही वापरत असलेलं जुनं क्रेडिट कार्ड हे तुम्हाला नवीन कर्ज घेण्यासाठी, इतर बँकांच्या क्रेडिट कार्डच्या ऑफर मिळवण्यासाठी पात्र करत असतं. जुन्या क्रेडिट कार्डमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत असतो. ते क्रेडिट कार्ड बंद करण्या ऐवजी नवीन क्रेडिट कार्ड बंद करण्याचा पर्याय निवडा.
ऑटो ऑप्शन बंद करा
तुमच्या क्रेडिट कार्डवरून बिलांचे ऑटो पेमेंट कट होत असेल तर ही सेवा पहिले बंद करा.क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यानंतर तुम्हाला काही रिवाॅर्ड पाॅइंट्स मिळत असतात. कार्ड बंद करण्य़ापूर्वी या पाॅइंटचा वापर करा.
बॅंकेकडून पावती घ्या
क्रेडिट कार्ड बंद केल्यानंतर नेमक्या कोणत्या तारखेपासून कार्ड बंद केल आहे त्याची पोहच पावती घ्या.
आरबीआय नियमावली
आरबीआयने देखील याबाबत एक नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी ग्राहकांना अनेक पर्याय दिले आहेत. यामध्ये बँकेचा हेल्पलाइन क्रमांक,सादर केलेला ईमेल आयडी,आयव्हीआर,वेबसाइटवरील त्याची लिंक,इंटरनेट बँकिंग,मोबाइल अॅप इत्यादी.या सर्व माध्यमातून क्रेडिट कार्ड बंद केले जाऊ शकते.ग्राहकाने क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती केल्यानंतर बँकेला 7 दिवसांच्या आत कार्यवाही पूर्ण करावी लागते. तसे न केल्यास कार्ड जारी करणार्या बँकेवर प्रतिदिन 500 रुपये दंड आकारला जातो. आणि हा दंड क्रेडिट कार्ड बंद होईपर्यंत लागू राहतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









