धूळ,माती आणि प्रदूषणामुळे केसांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यात उन्हाळ्यात केसांची खास काळजी घ्यावी लागते. कारण वातावरणातील उष्णतेमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेतला जातो. उन्हाळ्यात आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होते.अशावेळी आठवड्यातून किती वेळा केस धुवायचे असा प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊयात उन्हाळ्यात किती वेळा केस धुवावेत.
केस कितीवेळा धुवावेत हे केसांच्या स्थितीवरून ठरते. एक म्हणजे ऑयली हेअर आणि ड्राय हेअर तेव्हा आपल्याला त्याप्रमाणे आपले केस किती वेळा धुवावेत याबद्दल योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ड्राय केस असलेल्या महिला योग्य मॉश्चराईझर शॅम्पूसह आठवड्यातून तीन वेळा केस धुवू शकतात. तर ऑईली हेअर असलेल्या स्त्रियांनी निदान तीन वेळा तरी केस धुणे आवश्यक आहे. यामध्ये कोंडा आणि कुरळे केस असलेल्या तसेच पातळ केस असलेल्या महिलांनाही आपल्या केसांसाठी योग्य तो तज्ज्ञांचा सल्ला घेऊन केस धुणं आवश्यक आहे. बादाम, एरंडेल, जैतुन, नारळ आणि लव्हेंडर या पाच तेलाचा वापर केसांसाठी उन्हाळ्यात करावा. हे पाच तेल योग्य प्रमाणात मिसळून, अंघोळ करण्याआधी ४ तास केसांना लावून ठेवावे. त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत.पण आठवड्यातून किमान एकवेळा केस धुवायलाच हवेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









