वार्ताहर/कडोली
मुसळधार पावसामुळे कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात घरांची पडझड सुरूच असून नुकतेच जाफरवाडी येथे घराची पूर्ण भिंतच कोसळून सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर्षी मुसळधार पावसाने कहरच केला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. जाफरवाडी येथील मारुती लक्ष्मण गौंडाडकर यांच्या घराची पूर्ण भिंतच पडल्याने चार लाखांचे नुकसान झाले आहे. गाव तलाठी, अभियंते, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण गौंडाडकर यांनी पाहणी करून अहवाल तयार केला आहे.









