पावणेदोन लाख वसुलीचे आदेश
सावंतवाडी : प्रतिनिधी
शासकीय निवासस्थानाचा वापर करूनही आपल्या मासिक वेतनातून दरमहा घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते घेतल्याप्रकरणी सावंतवाडी उपवनसरंक्षक सावंतवाडी माणगाव वनपाल आणि तत्कालीन वनपाल यांच्याकडून वसुली लावली आहे. माणगाव वनपाल श्रेया सदानंद परब यांना १ लाख ८० हजार ८१७ रुपये भरणा करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तर तत्कालीन वनपाल सुनील सावंत, सध्या वनपाल, सामाजिक वनीकरण, कुडाळ यांच्याकडून वसुलीसंदर्भात सामाजिक वनीकरण, कुडाळ यांना पत्र देण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी माहिती मागितली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी वसुलीचे आदेश दिले आहेत.









