वारणानगर :
अंबप ता. हातकणंगले येथील यश दाभाडे या मित्राचा खून केल्याचा राग मनात धरून या खूनातील संशयीत आरोपी शाफिक मुल्ला यांच्या राजे गल्ली आनंदनगर, कोडोली ता.पन्हाळा येथील घरात घुसून प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली.
कोडोली येथे गुरुवार दि.5 रोजी भर दुपारी शाफिक यांचा जुना मित्र असलेला निरंजन उर्फ मोन्या वरवंटे रा. कोडोली अन्य सहा तरुणासह राजे गल्लीत कोयता,काठ्या,बॅट घेवून दोन मोटर सायकलवरून येत बाहेर कोणी यायचे नाही दारे बंद करा असे ओरडत येत त्यांनी शाफिक मुल्ला यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली.तसेच कारागृहातून बाहेर आलेवर त्याला जीवंत ठेवणार नाही असे धमकी देवून निघून गेले.
या प्रकरणाची फिर्याद शाषिक याची आई बिलकस शौकत मुल्ला हिने घरात चर्चा करून शाफिक याचा जुना मित्र निरंजन उर्फ मोन्या वरवंटे यासह अन्य सहा अनोळखी इसमाविरुद्ध उशिरा कोडोली पोलीसात नोंदवली.
दरम्यान कोडोली पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक अरविंद रायबोले यांनी घटनास्थळी धाव घेतली तत्पूर्वी हल्लेखोर पसार झाले होते. घटनास्थळी शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार यांनी भेट देवून माहिती घेतली.गुरुवारी दाखल झालेल्या गुह्यातील आरोपींना आज शुक्रवार दि. 6 रोजी उशिरा पर्यन्त अटक झाली नसल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले. तपास परिविक्षाधिन अधिकारी अरविंद रायबोले करीत आहेत.








