कातवड- कोळंब येथील घटना
सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान
मालवण / वार्ताहर
कातवड येथे रवींद्र परब यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. रवींद्र परब व त्यांची पत्नी मोलमजुरीसाठी बाहेर गेल्याने अनर्थ टळला. या दुर्घटनेत परब यांची रोख रक्कम, दागिने, टीव्ही , दोन कपाटे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिकांनी सदरची आग विझवली. मात्र नुकसानीमुळे परब कुटुंबियांना धक्का बसला आहे.