प्रतिनिधी /बेळगाव
शॉर्टसर्किटने घराला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. गोवावेसजवळील गोकुळनगर, पहिल्या क्रॉसवर ही घटना घडली असून आगीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे, भांडी, कपडे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
गोकुळनगर येथील प्रशांत घाटगे व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातून धूर येऊ लागल्यामुळे घरमालकांनी त्यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी तातडीने आपल्या घरी धाव घेतली. पोलीस, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
पाच लाखाची हानी
उपलब्ध माहितीवरून शॉर्टसर्किटने ही घटना घडली आहे. आगीत सुमारे पाच लाख रुपयांहून अधिक आर्थिक हानी झाली असून रात्री उशिरापर्यंत यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









