सांगली :
शहरातील संजयनगर पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येणाऱ्या वसंतदादा कुस्ती केंद्राजवळ असणाऱ्या पैलवान हौसिंग सोसायटीमधील बंद घर फोडले आहे. या बंद घरातून एक लाख 600 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. याप्रकरणी गोरख गजानन जगदाळे (रा. वसंतदादा कुस्ती पेंद्राजवळ सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी गोरख हे 17 ते 18 फेब्रुवारी दरम्यान कुटुंबासहित बाहेर गावी गेले होते. या कालावधीत त्यांचे बंद घर फोडून 87 हजार रुपये रोख, दोन हजार रुपयांचा एमआय टीव्ही, 1600 रुपयांचा मोबाईल आणि दहा हजार रुपयाची सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख 600 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. गोरख हे घरी आल्यावर त्यांना चोरीची माहिती समजल्यावर त्यांनी याची माहिती संजयनगर पोलीस ठाण्यास दिली. संजयनगर पोलिसांनी याठिकाणचा पंचनामा केला.








