कसबा बीड / प्रतिनिधी
ओसंडून वाहणारा पाऊस व प्रचंड वारा यामुळे करवीर तालुक्यातील कोगे येथे घरांच्या भिंतीची पडझड होऊन 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसाने ओढे, नाले भरून ओसंडून वाहत आहेत. नद्या,नाले व धरणे तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांचा शहराशी होणारा संपर्क तुटला आहे, जनजीवन विस्कळित झाले आहे
अधिक वाचा- ‘तुळशी’ जलाशयातून विसर्ग सुरू; ९३ टक्के भरल्याने संभाव्य पुरस्थितीमुळे विसर्गाचा निर्णय
.कोगे येथील शेतकरी आनंदा पांडूरंग सुतार यांच्या घराची पश्चिमेकडील भिंत व छत कोसळून जमीनदोस्त झाले आहे. अर्थिक परिस्थिती बिकट असणारे आनंदा सुतार यांचे पावसामुळे घर पडल्यामुळे त्यांची आर्थिक व प्रांपचीक साहित्याचेही नुकसान झाले आहे. अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पंचनाम्यामधून दिली आहे.