नुकसानभरपाई देण्याची शासनाकडे नागरिकांची मागणी
वार्ताहर /उचगाव
नुकत्याच झालेल्या पावसामुळे गणपत गल्ली, उचगाव येथील लक्ष्मी नागोजी पावशे यांचे राहते घर कोसळून पाच लाखाचे नुकसान झाल्याने सदर कुटुंब बेघर झाले आहे. सदर घटना दि. 14 रोजी सायंकाळी घडली. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पतीचे निधन झाल्याने घरामध्ये लक्ष्मी या एकटय़ाच राहतात. मुलगा कामानिमित्त बाहेरगावी राहतो. ज्या दिवशी घर कोसळले, त्या दिवशी त्या घरी नव्हत्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र घराचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नवीन घराची उभारणी केल्याशिवाय पर्याय नाही. तरी शासनाने घराची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









