प्रतिनिधी/ बेळगाव
श्रीनगर येथील एका घराला आग लागली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून आग दुर्घटना घडली त्यावेळी घरात कोणी नव्हते, असे सांगण्यात आले. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग विझविली. नेमकी ही घटना कशामुळे घडली? आगीत कितीचे नुकसान झाले? याचा तपशील उपलब्ध झाला नाही.









