सातारा MIDC परिसरात रात्री धाडसी घरफोडी
सातारा : सातारा शहरातील जुन्या एमआयडीसीत वृदांवन बंगला येथे ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते पहाटे पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञाताने गणेश नामदेव जाधव याच्या घरातील सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गणेश जाधव याच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप कशाने तरी तोडून घरात प्रवेश केला. घरातील किचनमधील लोखंडी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ५ तोळ्याचे कानातील झुमके, दोन सोन्याच्या अंगठ्या, ७ ग्रॅमचे गरसोळी, ६ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १८ ग्रॅमचे सोन्याचे पदक असलेले गंठण, सोन्याचे १ ग्रॅमचे गळसर, सोन्यांचे मनी पेंडल असा सुमारे दहा तोळे सोन्याचा ऐवज लंपास झाला आहे.
मात्र शासकीय आकडेवारीनुसार सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक जायपात्रे तपास करत आहेत.








