कोल्हापूर :
जेवणाच्या ताटाला रोटी पाहिजे, या कारणावऊन वाद घालीत, या टोळक्याने शहरातील स्टेशन रोडवरील एका हॉटेलची मोडतोड करीत, हॉटेलच्या मालकीणला, तिच्या दिरा आणि कामगाराला बेदम मारहाण कऊन जखमी केले. आदिती राजाराम ढुकमे (वय 31), तिचा दिर शोहेब इर्षाद शेख (वय 42), कामगार उत्तम धुळाप्पा आडूळकर (वय 21, तिघे रा. हॉटेल अमिरनजीक, स्टेशन रोड, शाहुपूरी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. या जखमीना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
या प्रकरणी आकाश हणमंत कांबळे, अतुल दिलीप कांबळे, अजय विजय जगदाळे, गणेश कुमार कांबळे, रोहित जाधव, रमेश माळगे, राजू कांबळे, समीर कांबळे (सर्व रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर) याच्यासह चार अल्पवयीन तऊण अशा अकरा जणाविरोधी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद जखमी आदिती ढुमके यांनी दिली आहे.
शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये संशयीत रमेश माळगे, समीर कांबळे, राजू कांबळे, किरण कांबळे हे चौघे जण जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी यासर्वांनी जेवणाच्या ताटाला रोडी पाहिजे, या कारणावऊन हॉटेलची मालकीण अदिती ढुमके हिच्याबरोबर वाद घालुन, तुम्ही हॉटेलचा धंदा कसे करताय तेच बघतो, तुमचे हॉटेल फोडतो अशी धमकी देवून, या चौघा संशयीतांनर आपल्या आणखीन मित्रांना बोलावून घेतले. त्यासर्वांनी हॉटेलची मालकीण ढुमके आणि तिचा दिर शोएब शेख, कामगार उत्तम आढूळकर या तिघांना शिवीगाळ करीत, लाथाबुक्क्याने आणि हॉटेलमधील स्टिल जग यांने मारहाण कऊन जखमी केले. त्यानंतर या टोळक्याने हॉटेलची तोडफोड कऊन पोबारा केला. ही घटना गुऊवारी रात्री घडली असून, याची शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.








