प्रतिनिधी /बेळगाव
सराफ गल्ली, शहापूर येथील हॉटेल समुद्रमध्ये पेबल्स रेस्टोरंट सी फूड फेस्टिव्हल दि. 22 ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उन्हाळय़ाच्या सुटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या खास ‘सी फूड’ फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावकर खाद्यप्रेमींसाठी ही एक खास पर्वणी आहे. विविध प्रकारच्या मत्स्य पदार्थांची रेलचेल या सी फूड फेस्टमध्ये आहे. प्रॉन्स, पॉपलेट, सुरमई, वेंर्ल्या, तिसऱया, खेकडे व इतर विविध मत्स्यपदार्थ उपलब्ध असतील.
प्रॉन्स चिल्ली, प्रॉन गोल्डन फ्राय, प्रॉन कोळीवाडा, फिश टिक्का अमृतसरी, किंग फिश फ्राय, मॅकेरेल करी गोवन स्टाईल, पॉपलेट फ्राय, क्रॅब करी हे पदार्थ सी फूड फेस्टचे खास आकर्षण आहे. हॉटेल समुद्रमध्ये यापूर्वीही विविध खाद्य महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. दररोज दुपारी 12.30 ते 3.30 व सायंकाळी 7.30 ते 10.30 या दरम्यान सी फूड फेस्ट चालू राहील. मित्रमंडळी व परिवारासमवेत या फेस्टचा आस्वाद घ्यावा, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.









