Hot Water Bath Side Effects : गेल्या चार दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. थंडी वाढली की गरम-गरम खाणे आणि ऊबदार कपडे या दोन गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते. याचबरोबर थंडीत गरम पाण्याने खूपवेळ आंघोळ करणारे अनेकजण आहेत.जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या त्वचेवर आणि केसांवर खूप वाईट परिणाम होतो.नेमके काय परिणाम होतात जाणून घेऊया.
शरीर सुस्तावत
रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरात आळस वाढू लागतो आणि आळस नेहमी राहतो.वास्तविक,गरम पाण्याने आंघोळ केल्यावर खूप झोप लागते.त्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता असते.
गरम पाण्याने केस कमजोर होतात
गरम पाण्याने केस कधीही धुवू नका. गरम पाण्याचा वारंवार वापर केल्याने केसांचा ओलावा निघून जातो,ज्यामुळे तुमचे केस कोरडे आणि खडबडीत होतात.इतकेच नाही तर खूप गरम पाण्याने केस धुतल्याने स्कॅल्पही कोरडी होते,त्यामुळे कोंड्याची समस्या वाढते आणि कोरडे केस गळू लागतात.
डोळे कमकुवत होतात
गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळ्यांवरही खोलवर परिणाम होतो. गरम पाण्याने अंघोळ केल्याने डोळे कमजोर होतात आणि आजूबाजूचा भाग सुरकुत्याने भरतो.यासोबतच डोळ्यांत लालसरपणा,खाज सुटणे,वारंवार पाणी येणे अशा समस्या उद्भवतात.
गरम पाणी त्वचेसाठी हानिकारक
थंडीत गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते.त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.उदाहरणार्थ,मुरुम,त्वचेचा कोरडेपणा,खाज सुटण्याबरोबरच त्वचेची चमकही कमी होऊ लागते.वास्तविक, जेव्हा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता तेव्हा आपल्या शरीरातील तेलकट थर निघून जातो.जो तुम्हाला बाह्य संसर्गापासून वाचवतो.ते काढून टाकल्यामुळे अनेक संक्रमण होतात.मुरुमा सारख्या समस्याही उद्भवू लागतात.
Previous Articleसर्वेश प्रभुखानोलकर याचे सी .ए .अंतिम परीक्षेत उज्ज्वल यश
Next Article सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी BSNL चे 103 टॉवर मंजूर









