सामनावीर मीर मिरजी, मालिकावीर सुमित भोसले
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सोळा वर्षाखालील मुलांच्या युनियन जिमखाना चषक आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेचे अंतिम लढतीत युनियन जिमखाना संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत के.आर. शेट्टी लायाज क्रिकेट अकादमी संघाचा 4 गड्यांने पराभव करत विजेतेपद पटकावले. सामनावीर मीर मिरजी, मालिकावीर सुमित भोसले याना गौरविण्यात आले. अंतिम लढतीत के आर शेट्टी लायाज क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडीबाद 120 धावा केल्या. त्यात साईराज चव्हाणने एक चौकार एक षट्कारासह 41, शुभम खोतने 2 चौकार व एक षटकारसह 30, स्वयंम खोतने 2 चौकारांसह 29 धावा केल्या. युनियन जिमखाना तर्फे मीर मिरजी 27 धावात 4, लक्ष शहा व ओमकार चौगुले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 21.3 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा जमवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
त्यात मोहम्मद अब्बासने 4 चौकारासह 22, आर्यन मुऊडकरने 2 चौकारासह 21, फरहान शेखने 15, सुप्रीत गंजीने 14, ओमकार चौगुलेने 13, लक्ष शहाने 12 धावा केल्या केल्या. लायाज अकादमी तर्फे सिद्धार्थ व आर्या शेट्टी यांनी प्रत्येकी 2 तर स्वयंम खोत यांनी एक गडी बाद केला. बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, चंदन कुंदरनाड, सुनील मुऊडकर, विजय दड्डीकर यांच्या हस्ते विजेता उपविजेता संघांना तसेच वैयक्तिक बक्षिसे पटकावलेल्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज मीर मिरजी, उत्कृष्ट फलंदाज शुभम खोत, इम्पॅक्ट खेळाडू मोहम्मद अब्बास, उदयोन्मुख क्रिकेटपटू आनंद जाधव, नीना क्रिकेट अकादमी संघाने तिसरे स्थान पटकावले तर विजया क्रिकेट अकादमी संघाला शिस्तबद संघ म्हणून घोषित करण्यात आले. मालिकावीर सुमित भोसले यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आली.









