11 हजार हेक्टरातील पिकांची हानी : बेळगाव, खानापूर तालुक्यात अधिक नुकसान
बेळगाव : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अघोषित भारनियमन केले जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. हेस्कॉमकडून अघोषित लोडशेडींगमुळे शेतीपिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकाची हानी झाली आहे. उर्वरित पिके पाण्याअभावी करपून जाऊ लागली आहेत. दरम्यान, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पिकांना पाणी देण्यासाठी थ्रीफेज वीजपुरवठ्याची गरज आहे. मात्र, हेस्कॉमकडून सातत्याने वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. यंदा पावसाअभावी निम्म्याहून अधिक उत्पादनात घट होणार आहे. त्याबरोबर बटाटा, कोबी, वांगी, चवळी, ज्वारी, कापूस आदी पिकांनाही फटका बसला आहे.
बेळगाव, खानापूर तालुक्यांचे सर्वाधिक नुकसान
बेळगाव, खानापूर तालुक्यात सर्वाधिक फळबागायतींचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्यामध्ये बटाटा, कोबी, वांगी, चवळी आदी पिकांना फटका बसला आहे. त्याबरोबर जिल्ह्यातील अथणी, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, कागवाड, कित्तूर, मुडलगी, निपाणी, रामदुर्ग, सौंदत्ती, यरगट्टी आदी तालुक्यातील 4518 हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांना फटका बसला आहे. दुसऱ्या टप्प्यात बेळगाव आणि खानापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. या बेळगाव आणि खानापूर तालुक्यात 6456 हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 12515 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
पिके नुकसान हेक्टरात
- भात 3789
- ज्वारी 1468
- चवळी 61088
- तृणधान्य 5059
- तूरडाळ 522
- उडीद 1205
- मूग 25664
- शेंगा 8253
- सोयाबीन 58914
- सूर्यफूल 523
- कापूस 10409
- तंबाखू 243
बागायती पिके नुकसान हेक्टरात
- कांदा 1819
- मिरची 301
- कोबी 296
- टोमॅटो 360









