महालक्ष्मी यात्रेदरम्यान घडलेल्या घटनेने खळबळ
बेळगाव :
शनिवारी रात्री गोकाक येथील जीआरबीसी कार्यालयासमोर एका तरुणाचा भीषण खून करण्यात आला आहे. खुनाच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परशुराम गोंधळी (वय 26) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोकाकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात यात्रोत्सव सुरू आहे. श्री महालक्ष्मी देवस्थानाच्या यात्रोत्सवात सारे मग्न असताना खुनाचा हा प्रकार घडला आहे. तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून या तरुणाचा खून करण्यात आला असून निश्चित कारण समजू शकले नाही.
‘तुझ्याशी बोलायचे आहे’ असे सांगत बोलावून घेऊन परशुरामचा खून करण्यात आला आहे. खुनानंतर गुन्हेगार तेथून फरारी झाले आहेत. मात्र, उशिरापर्यंत मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत होता.









