ट्रक अन् कारची टक्कर
वृत्तसंस्था/ हनुमानगढ
राजस्थानच्या हनुमानगढमध्ये भरधाव वेगात ओव्हरटेक करणे एका परिवाराला जीवघेणे ठरले आहे. समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसल्याने कारमधील 3 मुलांसमवेत 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले असून त्यांना बिकानेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे.
रिट्ज कारमधून लहान मुलांसमवेत एकूण 9 जण प्रवास करत होते. हनुमानगढ-सरदारशहर महामार्गावर भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली होती. ट्रकचालक आणि परिसरातील लोकांनी कारमध्ये अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढले, परंतु तोपर्यंत सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. जखमीपैकी एकाच प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









