तिलोत्तमा – 3
इथे वाचकांना ‘तीळ’ याबद्दल वैद्यकीय माहितीही देणे मी माझे कर्तव्य समजतो (ज्योतिषीय कारणमीमांसा आणि अर्थ हे तर आपण पाहणार आहोतच). मोल्स, ज्याला ‘नेवस’ किंवा ‘नेव्ही’ देखील म्हणतात, त्वचेच्या वाढीचा एक प्रकार आहे जो खूप प्रचलित आहे. पिगमेंटेड पेशींच्या क्लस्टर्समुळे ते त्वचेवर लहान, गडद तपकिरी डाग दिसतात. बालपण आणि पौगंडावस्थेमध्ये मोल्स अधिक सामान्य आहेत. सरासरी व्यक्तीमध्ये 10 ते 40 मोल असतात, त्यातील काही काळ बदलू शकतात किंवा अदृश्य होऊ शकतात. मोल्स ही त्वचेची वाढ आहे जी सहसा तपकिरी किंवा काळ्या रंगाची असते. त्वचेच्या कोणत्याही भागावर मोल्स एकटे किंवा गुच्छांमध्ये दिसू शकतात. बहुसंख्य मोल संपूर्ण बालपणात आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या पहिल्या 25 वर्षांमध्ये दिसतात. मोल्स सामान्यत: कालांतराने हळूहळू बदलतात, उंचावतात आणि/किंवा रंग बदलतात. कधी कधी तीळमध्ये केस वाढू शकतात. काही तीळ अपरिवर्तित राहू शकतात, तर काही कालांतराने नष्ट होऊ शकतात. बहुतेक मोल्स निरुपद्रवी आहेत. क्वचितच, ते कर्करोग होतात. मोल्स आणि इतर पिगमेंटेड पॅचचे निरीक्षण करणे हे शोधण्यात एक महत्त्वाचा टप्पा आहे त्वचेचा कर्करोग, विशेषत: घातक मेलेनोमा. अशा वेळी काही अस्वाभाविक वाढ आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला/मदत घ्यायला विसरू नका, हलगर्जीपणा करू नका. असो.
असे समजा की चेहऱ्यावर असलेला तीळ हा द्वी-मूल्य समीकरणाप्रमाणे असतो. म्हणजे dल्aत् न्aत्ल ल्aिtग्दह !!! म्हणजे एका तिळाची जागा, स्वरूप आपल्याला कळले तर त्याच्या जुळ्या तिळाचा अर्थ, जागा आणि स्वरूप आपण नक्कीच प्रकट करू शकतो. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे statग्stग्म्aत् sम्गहम आहे.
तिळाच्या रहस्याबद्दल आपण सर्वांनी ऐकले असेल, वाचले असेल पण कधी विचार केलात का की, आपल्या चेहऱ्यावर जर तीळ असेल तर त्यासारखा तीळ म्हणजे जुळा तीळ आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर असू शकेल आणि त्याचे फळ काय असू शकेल ? ही विद्या आपल्या देशातून गेली आणि ही विद्या खूप वर्षापासून आपल्यापासून दूरही राहिली. ही आपल्या घरची विद्या आपल्याला चमत्कार सांगून पूर्ण सन्मानित होऊन नवीन रंगरूपात एका आपल्याला गौरवीत करीत आहे. चेहऱ्यावरील तिळाचे जे फलित असते ते स्त्राr जातक आणि पुरुष जातकांसाठी वेगवेगळे असते. या तीळ रहस्याबद्दल चेहऱ्यावरील तिळांच्या स्थिती व त्या समान तीळ किंवा त्याच्या उत्तरादाखल तीळ आपल्या शरीरावर कुठे कुठे असतो ते सांगितले जाईल. त्याचबरोबर स्त्राr जातकासाठी व पुरुष जातकासाठी यांचे फळ काय असते ते सांगितले जाईलच, बरोबर अशा जातकांवर कुठल्या कुठल्या ग्रहांचा प्रभाव आहे तेही आपण ओळखू शकाल. सुरू करूया? पुढच्या भागापासून रहस्योद्घाटन. . . . (क्रमश:)
मेष
कार्यक्षेत्रात यश मिळेल. सोबत काम करणाऱ्याबरोबर वादावादीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य येईल. जोखीम घेणे टाळा. कुटुंबात शांतता राहील. मानसिकदृष्ट्या समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. संयमाने बोलणे आवश्यक आहे.
उपाय: मंगळवारी मारुतीरायाला गूळ आणि चणे अर्पण करा.
वृषभ
आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढीसाठी नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. कुटुंबात थोडा कलह होऊ शकतो. आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. अपचनाची समस्या भेडसावू शकते. मित्रांसोबत सहल होण्याची शक्यता. जुने प्रश्न मार्गी लागतील. मन:शांती लाभेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. संयम बाळगा आणि कोणत्याही वादात अडकू नका.
उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढरे कमळ अर्पण करा
मिथुन
नोकरीत थोडा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. पण उत्पन्न वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवन सुखकर राहील. कुटुंबात सुसंवाद राहील. प्रवास लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले मार्गदर्शन मिळेल. नवीन नाती उपयोगी ठरतील. जुन्या योजनांची फळे मिळू लागतील. आत्मविश्वास वाढेल. स्वत:वर अधिक विश्वास ठेवा.
उपाय: बुधवारच्या दिवशी दुर्गा स्तोत्र पठण करा.
कर्क
निर्णयक्षमतेची परीक्षा लागेल. मानसिक गोंधळ टाळा. कामाच्या ठिकाणी थोडे अडथळे येतील पण तुम्ही ते पार कराल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नातेसंबंधात थोडे चढउतार संभवतात. घरात थोडे मतभेद होऊ शकतात. संतुलन राखा. प्रवास शक्यतो टाळा. विद्यार्थ्यांनी मेहनत चालू ठेवावी. जुनी मैत्री पुन्हा जुळू शकते. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. संयम आवश्यक आहे.
उपाय: सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा.
सिंह
अति आत्मविश्वास घातक ठरेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील. आर्थिक लाभाची शक्यता. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. जुने प्रश्न मिटतील. आरोग्य सांभाळा. भागीदारीत लाभ होईल. प्रवासातून लाभ मिळेल. मानसिकदृष्ट्या समाधानकारक काळ. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळेल. इतरांना मदत कराल.
उपाय: रविवारी गूळ खोबरे वाटा
कन्या
आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. विशेषत: पचनसंस्थेशी संबंधित त्रास संभवतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येतील आणि त्यातून यशही मिळेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागेल. खर्चाच्या बाबतीत सावध रहा. एखादी जुनी रक्कम परत मिळण्याची शक्यता. प्रेमसंबंधात गोडवा राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील पण मेहनतीचे फळ मिळेल. घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल.
उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा.
तुला
आर्थिक बाबतीत चांगले योग. भागीदारीत लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात सौहार्द राहील. कुटुंबात सुसंवाद राहील. कामात नवीन योजना आखाल. कागदपत्रांचा घोळ होण्याची शक्यता आहे. एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. जुनी कागदपत्रे पुन्हा तपासावीत. सट्टा, गुंतवणूक यामध्ये सावधगिरी आवश्यक.
उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.
वृश्चिक
भावनिक स्थैर्य राखणे गरजेचे आहे. विशेषत: रक्तदाब व हृदयाशी संबंधित समस्या. कामात अडथळे येऊ शकतात पण त्यावर मात कराल. उत्पन्न सामान्य राहील. कौटुंबिक जीवनात थोडी खळबळ होऊ शकते. जुन्या मित्रांकडून सहयोग मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नवे कौशल्य शिकण्यास योग्य काळ आहे. वरिष्ठांची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करा.
उपाय: मंगळवारी लाल वस्त्र दान करा आणि मारुती स्तोत्र वाचा.
धनु
कामात प्रगती होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. नवीन आर्थिक संधी प्राप्त होतील. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवाल. प्रेमसंबंधांमध्ये नवा जोम येईल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल. धार्मिक कामात रस वाटेल. समाजात तुमचे महत्त्व वाढेल. आरोग्य चांगले राहील. आत्मविश्वास बळकट होईल. नवे प्रकल्प सुरू करण्यास योग्य वेळ. संपत्ती वाढीसाठी उत्तम काळ.
उपाय: मंदिरात पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा.
मकर
कामाचा ताण जाणवेल. सहकाऱ्यांशी समन्वय साधावा लागेल. उत्पन्न स्थिर राहील पण खर्च वाढतील. कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधात गोडवा टिकवावा लागेल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल. विद्यार्थ्यांनी स्वत:वर विश्वास ठेवावा. एखादी लपलेली गोष्ट उघड होऊ शकते. सावधपणे बोलावे लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. .
उपाय: शनी मंदिरात तेल अर्पण करा.
कुंभ
आर्थिक बाबतीत निर्णय काळजीपूर्वक घ्या. नोकरीत नवा बदल होण्याची शक्यता. मित्रांकडून मदत मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आरोग्य चांगले राहील. प्रवास फायदेशीर ठरेल. मानसिक स्तरावर समाधान राहील. आध्यात्मिकताही वाढेल. विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. काही गोष्टींची सुरुवात लांबेल.
उपाय: गुरुवारी गायींना हरभरऱ्याची डाळ खाऊ घाला.
मीन
आरोग्य सुधारेल. मित्रांचा पाठिंबा लाभेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. प्रवासाचे योग लाभदायक ठरतील. नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवास शुभ असेल. जुन्या अडचणी दूर होतील. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. घरात आनंदाचे वातावरण राहील.
उपाय: गुरुवारी श्री गुरुदेव दत्त मंत्र जपा.





